कलाकारांचा सन्मान करण्यासाठी स्नेहा इव्हेंट अँड मॅनेजमेंट घेऊन येत आहेत “महाराष्ट्र ड्रीम अचिव्हर अवॉर्ड”.

0

कलाकारांचा सन्मान करण्यासाठी स्नेहा इव्हेंट अँड मॅनेजमेंट घेऊन येत आहेत “महाराष्ट्र ड्रीम अचिव्हर अवॉर्ड”.

मुंबई-पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हा केवळ एक कार्यक्रम नसून कलाकारांच्या कलेचा तो उत्सव असतो. एकूणच टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातल्या कलाकारांचा कौतुक करणारा सोहळा असा साज असतो. चोखंदळ दर्शकांच्या मनाचा ठाव घेऊन त्यांचा आवडता कलाकार आणि आवडता कार्यक्रम कोणता असे काहीसे परीक्षण करून पुरस्कारांचे मानकरी निवडले जातात. पुरस्कार सोहळा दर्शकांसाठी त्यांच्या आवडत्या कलाकाराचा सत्कार असतो तर कलाकारांसाठी त्यांनी केलेल्या कामाची पावती, जी हे दर्शवते कि सर्वसामान्य जनतेला तुमच्या उत्कृष्ट कामगिरीची जाणीव आहे. असाच एक कलागुणांचे कौतुक करणारा पुरस्कार सोहळा “महाराष्ट्र ड्रीम अचिव्हर अवॉर्ड” आपल्यासाठी घेऊन आहेत स्नेहा इव्हेंट अँड मॅनेजमेंट.

स्नेहा इव्हेंट अँड मॅनेजमेंट प्रस्तुत “महाराष्ट्र ड्रीम अचिव्हर अवॉर्ड” चे आयोजन स्नेहा इव्हेंट अँड मॅनेजमेंटचे विष्णू मिश्रा करतील. मेयर हॉल, BMW शोरूम च्या समोर , जुहू लेन , अंधेरी पश्चिम , मुंबई ह्या ठिकाणी १५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गज हजेरी लावणार आहेत. कार्यक्रम प्रसंगी शहीद भागत सिंग सेवा दलाचे प्रमुख , पद्मश्री डॉ. जितेंद्र सिंग शुंटी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रतापराव पाटील चिखलकरजी आणि कॅप्टन ए डी मानेक कार्यक्रमाची शोभा वाढवतील. अभय ग्रुप ऑफ कंपनीज चे गुलाब शुक्ला, वास्तू कन्सल्टन्ट वैभव जोशी , ऍड. नागेश मिश्रा सन्माननीय अतिथी म्हणून आपली उपस्थिती दर्शवतील. स्नेहा इव्हेंट अँड मॅनेजमेंट प्रस्तुत आणि विष्णू मिश्रा ह्यांनी आयोजित “महाराष्ट्र ड्रीम अचिव्हर अवॉर्ड” अभय ग्रुप ऑफ कंपनीद्वारे प्रायोजित केले जाईल.

विष्णू मिश्रा ह्यांच्या स्नेहा इव्हेंट अँड मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित महाराष्ट्र ड्रीम अचिव्हर अवॉर्डमध्ये शिक्षण, उद्योग, व्यवसाय, आरोग्य, मनोरंजन, सामाजिक, राजकीय, सामाजिक संस्थांमध्ये प्रशंसनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांचा गौरव करण्यात येणार आहे. या सोहळ्यात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, या अवॉर्ड शोचा उद्देश 250 मुलींचे कन्यादान करण्याचा आहे. रायपूर धर्मलक्ष्मी जनसेवा ट्रस्टने 9 डिसेंबर 2023 रोजी मुंबईत याचे आयोजन करण्याचा संकल्प केला आहे, ही संस्था गेली सहा वर्षे अविरतपणे हे कार्य करत आहे.

यह भी पढ़ें:   पिछले कुछ समय से एक बार फिर से बढ़ती जा रही एलएसी पर चीनी हिमाकत, देश की सैन्य क्षमता को दिया जा रहा बढ़ावा :

कार्यक्रमाच्या वेळी तरुणांच्या मनाचा ठाव घेणारे आणि आपल्या सुरांनी जनतेला वेडावून टाकणारे शंकर भट्टाचार्जी आणि जतीन श्रॉफ ह्या प्रसिद्ध गायक कलाकारांचा लाईव्ह परफॉर्मन्स असणार आहे. एकंदरीत “महाराष्ट्र ड्रीम अचिव्हर अवॉर्ड” कलाकार सन्मान सोहळा आणि दर्शकांसाठी डोळ्याचे पारणे फिरणारी मेजवानी असणार आहे. अवॉर्ड शो बद्दल बोलताना स्नेहा इव्हेंट अँड मॅनेजमेंट चे विष्णू मिश्रा म्हणाले, ” रायपूर धर्मलक्ष्मी जनसेवा ट्रस्ट ह्याच्या महान कार्याला हातभार लावण्याची संधी आम्हाला मिळाली ह्याचा आम्हाला आनंद आहे. या शोच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना कन्यादान परिवाराशी जोडण्यासाठी चे निवेदन आम्ही करतो जेणेकरून 250 मुलींचे कन्यादान करून आपण सर्व पुण्याचे भागीदार होऊ…”

Leave A Reply

Your email address will not be published.